वाल्हेकरवाडीत दोघांवर कोयत्याने वार

By Admin | Updated: March 27, 2017 03:02 IST2017-03-27T03:02:16+5:302017-03-27T03:02:16+5:30

पूर्ववैमनस्यातून तीन आरोपींनी दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास वाल्हेकरवाडी

Valehekarwadi koatiya warri | वाल्हेकरवाडीत दोघांवर कोयत्याने वार

वाल्हेकरवाडीत दोघांवर कोयत्याने वार

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून तीन आरोपींनी दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी महादेव तुपे, नीलेश कांबळे आणि संदीप बढे (सर्व रा. तुपे चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत हिरालाल चव्हाण (वय १९), विशाल सोपान सोनवणे (दोघे रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. अभिजीत याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कबुतर चोरल्याच्या कारणावरुन फिर्यादी आणि आरोपींचे पूर्वी भांडण झाले होते. शनिवारी सायंकाळी अभिजीत आणि विशाल हे दोघे वाल्हेकरवाडी येथून दुचाकीवरुन जात होते. त्या वेळी त्यांच्या मागावर असलेल्या आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये विशाल गंभीर जखमी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Valehekarwadi koatiya warri