शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination | पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना लसीचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:16 IST

कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत असताना लसीचा साठा संपल्याने लसीकरण देखील ठप्प झाले आहे...

- प्रकाश गायकर

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येतो. सद्यस्थितीत शहरातील बाधितांची संख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. मध्यंतरी कोरोनाच्या बाधितांची संख्या कमी झाली होती. तीव्रता कमी झाल्याने नागरिकांनीही लसीच्या बूस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. मात्र, सध्या कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत असताना लसीचा साठा संपल्याने लसीकरण देखील ठप्प झाले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. नागरिकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. शहरात अद्यापपर्यंत केवळ दोन लाख ३८ हजार ५२३ नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. सध्या बाधितांची संख्या वाढत असल्याने केंद्र व राज्य सरकार अलर्ट झाले आहे. शासन स्तरावरून नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आठ केंद्रावर लसीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, लसींचा साठा संपल्याने लसीकरण मोहिम ठप्प झाली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता बाधितांची संख्या वाढत असली तरी रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तसेच रुग्णालयामध्ये अवघ्या पाच रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. बाधितांना घरीच गृहविलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यांच्यामध्ये सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे आहेत. मात्र ती सौम्य असल्याने अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये रुग्ण ठणठणीत बरे होत असल्याचे वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मध्यंतरी बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली होती. लसीचा साठा संपला आहे. त्यासाठी मागणी केली आहे. साठा उपलब्ध झाल्यावर त्वरित लसीकरण सुरू केले जाईल. आता दिवसभरामध्ये सरासरी २५ ते ३० बाधित आढळत आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. १७० बाधितांपैकी अवघे ५ रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यांचीही प्रकृती चांगली असून लवकरच डिस्चार्ज दिला जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. - डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड