वि. दा. सावरकरांचे तैलचित्र बसविणार
By Admin | Updated: April 26, 2017 03:48 IST2017-04-26T03:48:04+5:302017-04-26T03:48:04+5:30
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात बसविण्यात येणार आहे.

वि. दा. सावरकरांचे तैलचित्र बसविणार
पिंपरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात बसविण्यात येणार आहे. त्याबाबतचा ठराव महापालिका सभेत सर्वानुमते करण्यात आला.
महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. एप्रिल महिन्याची तहकूब सभा मंगळवारी घेण्यात आली. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका सभागृहात सध्या छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती राजर्षी शाहूमहाराज, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, यशवंतराव चव्हाण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अण्णासाहेब मगर, अण्णासाहेब पाटील, प्रा. रामकृष्ण मोरे या विविध तेरा महापुरुषांची व नेत्यांची तैलचित्रे लावण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)