मोशी : निर्माल्य संकलनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आणि इतर यंत्रणांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, पुरेशा जनजागृतीअभावी या उपाययोजना प्रभावी ठरल्या नाहीत. परिणामी निर्माल्याची समस्या कायम आहे. यावर मात करण्यासाठी मानवरहित मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. थेट नदीपात्रातून या मशिनच्या साह्याने निर्माल्य संकलन करणे शक्य झाले आहे.
मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 17:09 IST
मुंबईतील बोरिवली येथील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग यांनी या मशिनची निर्मिती केली आहे. या मशिनच्या साह्याने मोशीतील इंद्रायणी नदीपात्रातील निर्माल्य संकलन करण्यात येत आहे.
मानवरहित मशिनव्दारे निर्माल्य संकलन : मोशीत प्रयोग
ठळक मुद्देनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठीचा प्रयत्न ३५० किलो निर्माल्य एकावेळी संकलित करण्याची या मशिनची क्षमता पिंपरी-चिंचवडमहापालिका हद्दीतील पवना आणि इंद्रायणी नदी पात्रातील निर्माल्याचे संकलनही मशीन समुद्रात चार किलोमीटरपर्यंतचा कचरा आणि निर्माल्य संकलित करू शकते.