वैश्विक विद्यापीठ वेदांच्या अध्ययनाची ओळख बनेल : बापट

By Admin | Updated: February 4, 2016 01:19 IST2016-02-04T01:19:12+5:302016-02-04T01:19:12+5:30

आपला देश वेदांमुळे वैभवशाली तर देशाची संस्कृती व इतिहास हा संतांच्या अध्ययनामुळे तयार झाला आहे. देवले येथील वैश्विक विद्यापीठ या सर्वांची खरी ओळख करण्याचे काम करेल व जगाला मार्गदर्शक ठरेल.

Universities will be introduced to study Vedas: Bapat | वैश्विक विद्यापीठ वेदांच्या अध्ययनाची ओळख बनेल : बापट

वैश्विक विद्यापीठ वेदांच्या अध्ययनाची ओळख बनेल : बापट

लोणावळा : आपला देश वेदांमुळे वैभवशाली तर देशाची संस्कृती व इतिहास हा संतांच्या अध्ययनामुळे तयार झाला आहे. देवले येथील वैश्विक विद्यापीठ या सर्वांची खरी ओळख करण्याचे काम करेल व जगाला मार्गदर्शक ठरेल.
जगाच्या नकाशात या विद्यापीठाचा व परिसराचा नावलौकिक होईल, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी देवले या ठिकाणी होणाऱ्या आदित्य प्रतिष्ठानच्या वैश्विक संत विद्यापीठाच्या भूमिपूजन व
वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी व्यक्त
केले.
महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विद्या विश्वपती व विद्यापीठाचे प्रवर्तक गुरुदेव शंकर अभ्यंकर, मिरजचे आमदार सुरेश खाडे, उद्योजक सुरेश हावरे, अपर्णा अभ्यंकर, आदित्य अभ्यंकर, देवलेच्या सरंपच वैशाली शिंदे, औंढोलीगावच्या सरंपच जागृती मांडेकर, राहुल आंबेकर, साईनाथ मांडेकर, रवींद्र शिंदे,
योगेश लोहोर, प्रदीप आंबेकर यांच्यासह विद्यापीठाचे अनेक सदस्य व परिससरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार खाडे यांनी देवले औंढोली रस्त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी मी व पालकमंत्री पाठपुरावा करून कटिबद्ध राहू, असे सांगितले. शिवशाहीर पुरंदरे, हावरे, अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले.शंकर अभ्यंकर यांनी प्रास्ताविक, तर आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)

Web Title: Universities will be introduced to study Vedas: Bapat