वाकडला आढळला अनोळखी मृतदेह

By Admin | Updated: January 14, 2017 02:52 IST2017-01-14T02:52:12+5:302017-01-14T02:52:12+5:30

वाकड, जगताप डेअरी येथे एका वाहनात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. वाकड ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसांपासून

Unidentified bodies found in quarrels | वाकडला आढळला अनोळखी मृतदेह

वाकडला आढळला अनोळखी मृतदेह

पिंपरी : वाकड, जगताप डेअरी येथे एका वाहनात अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. वाकड ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दिवसांपासून जाहिरात करण्याचे वाहन उभे करण्यात आले आहे. या वाहनाच्या केबिनमधून वास येत असल्याबाबतची माहिती तेथूून जाणाऱ्या नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्या ठिकाणी तपासणी केली असता, एकजण मृतावस्थेत आढळून आला. मृताची ओळख पटलेली नसून अंदाजे चाळीस वय आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.(प्रतिनिधी)

Web Title: Unidentified bodies found in quarrels