राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:58 PM2023-02-13T17:58:25+5:302023-02-13T17:58:41+5:30

गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत

Unconstitutional Chief Minister meeting in the state crowded with empty chairs Criticism of Aditya Thackeray | राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

राज्यातील घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी; आदित्य ठाकरेंची टीका

googlenewsNext

पिंपरी : घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला फक्त रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते. कारण, त्यांनी खुर्च्यांसाठी गद्दारी केली आहे. गद्दारांना जाब विचारणा‍ऱ्यांच्या मागे पोलीस लावले जातात. लाठीचार्ज केला जातो. त्यांच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात.  राज्यातील घटनाबाह्य सरकार पडणार म्हणजे पडणार आहे, अशी टीका माजी पर्यटन मंत्री आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाल्हेकरवाडी येथे केली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त महाविकास आघाडीची सभा झाली. यावेळी  ठाकरे म्हणाले, राज्यात आणि देशात गद्दारी कोणालाच पटलेली नाही. लोकांमध्ये प्रचंड रोष आणि चीड आहे. याआधी अनेक लोकांनी त्यांची राजकीय विचारसरणी बदलली, पक्ष बदलले. त्यांनी आपल्या आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच ते दुस‍ऱ्या पक्षात गेले आणि निवडणुकीला सामोरे गेले ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती.’’

पन्नास खोके एकदम ओके

ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाषणात सहभागी करून घेतले. हे सरकार कोणते आहे? त्यावर कार्यकर्त्यांनी आवाज दिला, खोके सरकार.’’ कसे? असे विचारले. त्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. त्यानंतर वेदान्ता प्रकल्प, एअर बस प्रकल्प आणि आमदार कोठे नेले, त्यावर कार्यकर्त्यांनी ‘गुजरातला असे उत्तर दिले. ठाकरे म्हणाले, ‘‘. मात्र, आठ महिन्यांपूर्वी राज्यात निर्लज्जपणाचे गलीच्छ राजकारण राज्यात घडले. असे राजकारण आपण आयुष्यात पाहिले नाही. आम्ही कधीही खोक्यांना हात लावला नाही. पण त्यांच्यावर ‘पन्नास खोके एकदम ओक्के’’ अशी टीका होते. गद्दारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चाळीस वार केले. पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर वार समोरून करायला हवा. महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान सरकारला मान्य आहे. लोकशाहीची खून केला जात आहे. जाती-जातीमध्ये वाद निर्माण केला जात आहे. गरीबी, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न बाजूला पडले आहेत. महाशक्ती विरोधात जनशक्तीची गरज आहे.’’

Web Title: Unconstitutional Chief Minister meeting in the state crowded with empty chairs Criticism of Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.