शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पवना धरणाच्या पात्रात अनधिकृत फार्म हाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 14:15 IST

धरणाच्या परिसरात लेक व्ह्यूच्या आकर्षणापोटी पुणे-मुंबईतील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे.

ठळक मुद्दे‘लेक व्ह्यू ’चे आकर्षण : पाटबंधारे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष धरणाच्या आजूबाजूला वीकेंड व फार्म हाऊसच्या नावाखाली आलिशान बंगल्यांची उभारणी प्रशासकीय अधिकारी व पवनाधरणाच्या अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

सचिन ठाकर । पवनानगर : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसराला अनधिकृत बांधकामाचा विळखा पडला आहे. धरणाच्या पात्रालगत ‘लेक व्ह्यू’च्या आकर्षणापोटी अवैध बांधकामे, फार्म हाऊसचा ट्रेंड वाढत चालला आहे. धरण परिसर वन व पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणाखाली येतो. मात्र, संंबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे अनधिकृत फार्म हाऊस  उभी राहत आहेत. याठिकाणी निर्माण होणारा कचरा व सांडपाणी थेट धरणाच्या प्रवाहात सोडले जात आहे.प्रदूषणाचा परिणाम धरणातील जीवसृष्टीवर होत आहे. पवना नदीच्या उगमापासून अतिक्रमणाला सुरवात झाली आहे. पवनानगर येथे नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या पवना धरणातून पिंपरी-चिंचवड व मावळ तालुक्यातील नागरिकांना थेट पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरण परिसरात लेक व्ह्यूच्या आकर्षणापोटी पुणे-मुंबईतील गुंतवणूकदारांनी जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे. धरणाच्या आजूबाजूला वीकेंड व फार्म हाऊसच्या नावाखाली आलेशान बंगले उभारले जात आहेत. याठिकाणी शनिवार व रविवार पर्यटकाची वर्दळ असते. काही पर्यटक मद्यपान करतात व काचेच्या बाटल्या धरण परिसरात टाकतात. त्यामुळे धरण परिसरात दुर्गंधी वाढू लागली आहे. पवना धरणापासून ते बेबडओहळ या परिसरातील नदी प्रवाहाची पाहणी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष केली. या वेळी नदी प्रदूषणात वाढ करणाऱ्या अनेक बाबी समोर आल्या. पवना धरणाच्या खालील बाजूला असलेल्या नदी प्रवाहात अनेक ठिकाणी पाण्यामध्ये सर्रासपणे जनावरे व गाड्या धुतल्या जातात. त्यामुळे पाण्याच्या प्रदूषणात वाढ होत आहे. धरणाच्या खालील भागात काही ठिकाणी टँकर पाण्यामध्ये उभा करून भरला जात असतो त्यामुळे गाड्याचे आॅईल व विषारी पदार्थ पाण्याच्या प्रवाहात मिसळले जात आहेत. या प्रदूषणाची नदीच्या प्रवाहातील जीवसृष्टीला हानी पोहचत आहे. ....................अतिक्रमणामुळे पूरस्थितीपवना नदीपात्राला लागून अनेक बांधकामे उभी राहत असतानाही पवना धरणाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग व प्लॅस्टिक दिसत आहे. पवना पात्रात बेकायदा बांधकामांमुळे पावसाळ्यात धरणाचे सगळे दरवाजे उघडल्यानंतर पाणी आडते. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण होत असते. तर नदी पलीकडील गावाचा संपर्क तुटतो. परंतु, प्रशासकीय अधिकारी व पवनाधरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPavna Nagarपवना नगरDamधरणHomeघर