शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

सभा न घेताच कोऱ्या कागदावर नागरिकांच्या सह्या घेण्याचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:00 IST

पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयात शनिवारी सकाळी मौखिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी सभेचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देसकाळी साडेदहाच्या सुमारास केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही धक्कादायक बाब समोर

नारायण बडगुजर

पिंपरी : तंबाखू सेवनविरोधी जनजागृतीसाठीची मोहीम केवळ कागदोपत्री राबविण्यात येत आहे. पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयात शनिवारी (दि. २२) सकाळी मौखिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र सभेबाबत माहिती नसल्याने नागरिक फिरकले नाहीत. असे असतानाही सभा झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यासाठी एका कोऱ्या कागदावर रुग्ण व नातेवाईकांच्या सह्या घेण्यात येत होत्या. ' लोकमत' ने शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब समोर आली.

तंबाखूविरोधी सेवन पंधरवडा अंतर्गत महापालिका रुग्णालय, बाह्य रुग्णालय, दवाखाने तसेच गटस्तरावर सभा घेण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. असे असतानाही बहुतांश रुग्णालयांमध्ये अशा सभा घेण्यात आल्या नाहीत. त्याबाबत लोकमत प्रतिनिधीने पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयास शनिवारी सकाळी साडेदहाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयात केवळ चार रुग्ण होते. औषध विक्रीच्या खिडकीजवळ महिला कर्मचारी दोन कोरे कागद घेऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची नावे लिहून घेत होती. केसपेपर घेऊन लोकमत प्रतिनिधी तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात गेला. त्यानंतर औषध विक्रीच्या खिडकीजवळ आल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने प्रतिनिधीलाही नाव विचारून लिहून घेत कोऱ्या कागदावर सही करण्यास सांगितले. सह्या नेमक्या कशासाठी घेण्यात येत आहेत, असा प्रश्न उपस्थित केल्याने संबंधित कर्मचा-यांची भंबेरी उडाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार सही घेत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांकडे महापालिकेचा शिक्का असलेली नोंदवही नव्हती. तसेच सही घेण्यात येणाऱ्या कागदावरही तसा शिक्का किंवा सविस्तर माहिती नमूद केलेली नव्हती. मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, कोणाला तोंडात जखम असल्यास संबंधिताची मौखिक तपासणी करण्यात येते. नागरिकांना मौखिक आरोग्य जपण्याबाबतचे शिक्षणही या माध्यमातून देण्यात येते, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र अशी कोणतीही माहिती न देता केवळ सही का करून घेतली जात आहे, असा प्रश्न केल्यानंतर संबंधित कर्मचारी गोंधळले. साहेब, सर्वेसाठी बाहेर गेले आहेत. बाकीचे कर्मचारीही कामात आहेत. त्यामुळे नागरिकांची नावे लिहून सही घेत असल्याचे संबंधित कर्मचा-यांनी सांगितले. 

तंबाखू सेवनविरोधी दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शनिवारी सकाळी बाह्य रुग्णालयात सभा घेण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या सह्या घेण्यात येत होत्या. तंबाखू व गुटखा खाण्याने होणाऱ्या  दुष्परिणामांबाबत या वेळी नागरिकांना माहिती देण्यात येत होती. डॉ. रुतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी, बाह्यरुग्णालय, पिंपरीगाव

प्रत्येक उपक्रमाची माहिती पत्रके, फलक प्रत्येकवेळी उपलब्ध होतीलच असे नाही. एकाचवेळी अनेक मोहिमा सुरू असतात. नियमित कार्यक्रमाचा भाग म्हणून त्या राबविल्या जातात. कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करावेच लागते. डॉ. पवन साळवे,‍ अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल