शहरं
Join us  
Trending Stories
1
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
2
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
3
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
4
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
5
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
6
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
7
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
LPG, ITR ते क्रेडिट कार्ड... १ सप्टेंबरपासून ‘या’ ७ गोष्टींचा तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
11
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
12
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
13
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
14
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास
15
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
16
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
17
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
18
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
19
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
20
maratha andolan: आझाद मैदानात चिखलात बसून आंदोलन

दापाेडीत ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या दाेघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 20:43 IST

दापाेडीत ढिगाऱ्याखाली गाडलेल्या पाच जनांपैकी दाेघांचा मृत्यू झाला असून शाेधकार्य अद्याप सुरु आहे.

पिंपरी : दापोडीतील आई उद्यानासमोरील जलनि:स्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात गाडलेल्या पाचपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दल आणि आपत्तीव्यवस्थापानाचे पथक दाखल झाले आहे. खड्डा उकरण्याचे काम सुरू आहे.  ही घटना रविवारी पावणसातच्या सुमारास घडली.

दापोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश कल्याण जमादार (वय २०, दापोडी), इश्वर बडगे, निखील गोगावले अद्यापही गाडले गेले असून सिताराम सुरवसे, सरोज पुंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. दापोडीतून पुणे-मुंबई महामार्गाकडे जाण्यासाठी रस्ता पुलाच्या अलिकडे आई गार्डन आहे. गार्डनपासून गणेश इंग्लिश मेडीयम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या वतीने जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे पंधरा ते वीस फुट खोल चर खोदले आहेत. अंधार पडल्यानंतरही येथे काम सुरू होते.

सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने रस्ता उकरण्याचे काम सुरू होते. तर काही कामगार खड्यातील माती काढत होते. त्यावेळी त्यामुळे रस्त्यावरच ढिगारा करून माती टाकली जात होती. त्यावेळी काही कामगार त्या ढिगाऱ्यावर उभे होते. अचानक ढिगारा ढासळल्याने चार कामगार खड्यात  गाडले गेले. त्यावेळी उर्वरित कामगारांनी जीव वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. तर जेसीबी चालकांने घटनास्थळावरून धूम ठोकली. त्यानंतर यावेळी प्रत्यक्षदर्शिनी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दल आणि महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थानास माहिती दिली त्यानंतर काहीवेळातच अग्शिनशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कामगारांना काढण्याचा प्रयत्न करीत असताना अग्निशामक दलाचाही एक कर्मचारी खड्यात पडला आहे. त्याला काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधारामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.  जखमींना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहे.

शोधकार्य सुरूखड्डा अधिक खोल असल्याने एनडीआरएफच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले आहे. गाडलेल्या कामगारांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  महापालिकेच्या आपतकालीन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, अग्निशामक विभागाचे ऋषिकांत चिपाडे, प्रताप चव्हाण यांचे पथक शोध कार्य करीत आहेत. रात्री पावणे नऊच्या सुमाराम एनडीआरएफ आणि आर्मीचेही पथक मदतीसाठी दाखल झाले आहे.

बघ्यांची गर्दी, शोधकार्यात अडथळाघटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी याठिकाणी येणारा रस्ता बंद केला आहे. आपतकालीन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल म्हणाले, ‘‘खड्यात कामगार पडल्याची माहिती मिळताच आपतकालीन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि आर्मीच्या पथकांच्या मदतीने मदत कार्य सुरू आहे. मदत करत असताना अग्शिनशामक दलाचा एक जवानही खड्यात पडला आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.’’

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड