शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीचा हॉर्न वाजवल्याने दोघांना बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:00 IST

पिंपरी : दुचाकीचा हॉर्न वाजवला म्हणून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले. ...

पिंपरी : दुचाकीचा हॉर्न वाजवला म्हणून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले. सावकार चौक, मोरे वस्ती, चिखली येथे गुरुवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. 

अजय भरत जाधव (वय २४, रा. मोरेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह तुषार शिंदे उर्फ बारक्या, पपड्या आणि धम्मपाल उर्फ ढम्या यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लखन उर्फ लक्ष्मण बसवराज गाडेकर (वय २४, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी या प्रकरणी शुक्रवारी (दि. १५) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र रुपेश प्रमोद ठाकूर यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी सावकार चौक येथे आल्यावर तेथे रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे रुपेशने गाडीचा हॉर्न वाजवला. तू हाॅर्न का वाजवतो, असे आरोपी म्हणाले. आम्हाला जायचय रस्ता सोड, असे फिर्यादी म्हणाले. त्याचा राग आल्याने आरोपींनी वाद घातला. तसेच फिर्यादी व त्यांचा मित्र रुपेश ठाकूर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादीच्या डोक्यात दगड मारल्याने फिर्यादी जखमी झाले. पुन्हा या रस्त्यावर दिसला तर याद राखा, अशी धमकी देखील आरोपींनी दिली. तसेच रुपेश यांच्या गाडीची हेडलाईट फोडून नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस हवालदार पी. एस. परब तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी