कार अपघातात दोन पोलीस ठार
By Admin | Updated: July 25, 2015 01:44 IST2015-07-25T01:44:00+5:302015-07-25T01:44:00+5:30
रजा घेऊन गावी निघालेल्या पोलीस निरीक्षकाच्या वाहनाचा अपघात होऊन त्यांच्यासह एक पोलीस हवालदार जागीच ठार झाल्याची घटना पुणे येथे घडली

कार अपघातात दोन पोलीस ठार
मुंबई : रजा घेऊन गावी निघालेल्या पोलीस निरीक्षकाच्या वाहनाचा अपघात होऊन त्यांच्यासह एक पोलीस हवालदार जागीच ठार झाल्याची घटना पुणे येथे घडली. या अपघातात वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन केंगारे (४७) आणि मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदार सतीश शिंदे (५१) यांचा जागीच मृत्यू झाला.
मूळचे सातारा येथील रहिवासी असलेले केंगारे भोईवाडा परिसरात राहत होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. १९९५ पासून ते पोलीस क्षेत्रात कार्यरत असून गेल्या वर्षभरापासून ते वरळी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत होते. गुरुवारी रात्री त्यांनी गावी जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार पोलीस शिपाई शिंदे यांच्यासह आणखी तीन मित्रांसोबत ते डस्टर कारने सकाळी साताऱ्याकडे रवाना झाले होते. दुपारी दीडच्या सुमारास
पुणे येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कामशेत बोगद्यावरून वळण घेत चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार उलटून अपघात झाला. (प्रतिनिधी)