शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थेरगावला पवना नदीत दोन जण बुडाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:54 IST

पिंपरी : चिंचवड येथून पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून ...

पिंपरी : चिंचवड येथून पवना नदीतून थेरगाव येथे येणाऱ्या चार जणांपैकी दोघे बुडाल्याची शक्यता आहे. यातील दोघे बचावले असून दोन जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

रवी राजकुमार गायकवाड (वय १३), नरसिंग महादेव जाधव (वय २१, दोन्हीही रा. काळेवाडी), असे बचावलेल्या दोघांची नावे आहेत. तर पिंटू विठ्ठल गायकवाड (वय ३५), ओम प्रकाश जाधव (वय २५, दोन्हीही रा. काळेवाडी), असे शोध सुरू असलेल्या दोघांची नावे आहेत. 

वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी गायकवाड, नरसिंग जाधव, पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे चौघेही रविवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथून पवना नदी पात्रातून थेरगाव येथील स्मशानभूमीजवळ येत होते. चौघांनाही पोहता येत असल्याने ते पोहत येत होते. त्यात रवी गायकवाड व नरसिंग जाधव हे नदी पात्रातून सुरक्षीत बाहेर आले. मात्र पिंटू गायकवाड आणि ओम जाधव हे नदी पात्रातून बाहेर आले नाहीत. त्यामुळे त्यांचा  शोध सुरू केला. तसेच याबाबत पोलीस व अग्निशामक दलाला माहिती दिली. त्यानुसार पोलीस तसेच महापालिकेच्या पिंपरी व रहाटणी केंद्रातील दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन बोटींच्या साह्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.

थेरगाव येथे पवना नदी पात्रात गाळाचे प्रमाण जास्त असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे दोघे तेथे बुडाले असल्याची शक्यता आहे, असे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी