कासारसाईतील अल्पवयीन मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 13:44 IST2018-09-25T13:35:22+5:302018-09-25T13:44:35+5:30
हिंजवडी जवळील कासारसाई येथे घडलेल्या अ आणखी दोघांना अटक केली आहे. पिडीत मुलीकडे पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आली आहे.

कासारसाईतील अल्पवयीन मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक
हिंजवडी : हिंजवडी जवळील कासारसाई येथे घडलेल्या मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. पिडीत मुलीकडे पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब समोर आली आहे. पीडित मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी सुमीरन गुरुदास गायकवाड ( वय १८ ), सोमनाथ अतिष वाघोले (२३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ ) या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. यापूर्वी गणेश निकम याच्यासह आणखी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.
चॉकलेटचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना रविवारी (दि.१६) घडली होती. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बुधवारी (दि.१९) ही घटना उघडकीस आली होती.सर्वच स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. विविध राजकीय, प्रशासकीय तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पिडीत कुटुंबातील व्यक्तींना भेटून आधार देत आहे. आरोपींवर अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयाकडून होत आहे.