कामशेतजवळील अपघातात दोन ठार

By Admin | Updated: July 13, 2015 04:03 IST2015-07-13T04:03:52+5:302015-07-13T04:03:52+5:30

कामशेत येथे जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या धोकादायक वळणावर अज्ञात वाहनाने शनिवारी सकाळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला जोरात

Two killed in a road accident near Kamlesh | कामशेतजवळील अपघातात दोन ठार

कामशेतजवळील अपघातात दोन ठार

वडगाव मावळ : कामशेत येथे जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या धोकादायक वळणावर अज्ञात वाहनाने शनिवारी सकाळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला जोरात धडक दिल्याने मोटार दुभाजकाच्या मध्ये आदळली. या अपघातात मोटारीमधील दोघे जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, एमएच ४३ एआर ६७५ क्रमांकाच्या मोटारमधून सुनील फ्रान्सेज डिसुजा ( वय २६), परेश महादेव वाविया (वय ३०), प्रज्ञेश परबत कारोत्रा ( वय २०, तिघे रा. वाशी, नवी मुंबई) व सागर विष्णू गावडे ( वय २१, रा. नांदवडे, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हे चौघे मित्र वाशी येथून खासगी कामासाठी पुण्याला निघाले होते. त्यांच्या मोटारीला कामशेत येथे हॉटेल जयमल्हारजवळ अज्ञात वाहनाने डाव्या बाजूला जोरात धडक दिल्याने कार दुभाजकाच्या मध्ये आदळून थांबली. अपघातात सुनील डिसुजा व सागर गावडे यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. परेश वाविया व प्रज्ञेश कारोत्रा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती कळताच पोलीस कर्मचारी अनंता खेडेकर, विशाल बोऱ्हाडे, उमाजी मुंढे व शिवाजी सस्ते यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वैद्यकीय उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी
रुग्णालयात दाखल केले. तपास सहायक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग निंबाळकर करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Two killed in a road accident near Kamlesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.