विजयनगरात दोन कुटुंबात भांडण
By Admin | Updated: November 12, 2015 02:23 IST2015-11-12T02:23:56+5:302015-11-12T02:23:56+5:30
चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टीत दोन कुटुंबीयांमध्ये भांडण झाले. त्यांनी परस्परांविरुद्ध चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

विजयनगरात दोन कुटुंबात भांडण
पिंपरी : चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टीत दोन कुटुंबीयांमध्ये भांडण झाले. त्यांनी परस्परांविरुद्ध चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार परस्परांविरुद्ध दोन्हीकडील व्यक्तींनी दाखल केली आहे.
अनिता कृष्णा थोरात (रा. विजयनगर झोपडपट्टी) यांनी लखन ऊर्फ बाबा युवराज गवळी, कृष्णा थोरात यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. तर कृष्णा चंद्रकांत थोरात यांनी आरोपी विठ्ठल राजाराम पवार, संतोष प्रभाकर लोंढे,अनिल कृष्णा तिपाले, शोभा प्रभाकर लोंढे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. दोन्ही फिर्यादीत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)