शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

पिंपरीत दोन घरफोड्या; सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:40 IST

चोरट्यांनी पाच लाख २१ हजारांचा ऐवज लंपास केला.

पिंपरी : अजमेरा कॉलनी येथे घरफोडीचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. या दोन्ही प्रकरणांमध्ये पाच लाख २१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याबाबत सोमवारी (दि. ०२) त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात नितीन मोहन क्षीरसागर (वय ३२, रा. अजमेरा हाउसिंग सोसायटी, म्हासु‌‌‌‌‌ळकर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी क्षिरसागर त्यांच्या सासऱ्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी शनिवारी (दि. ३१) दुपारी चार वाजता देहूगाव येथे गेले. कार्यक्रम झाल्यानंतर ते सोमवारी (दि. ०२) सकाळी साडेआठ वाजता देहूगाव येथून परत आले दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घराच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेले तीन लाख ९१ हजार रुपये किमतीचे ६५ ग्रॅम वजनाचे सोने आणि रोख रक्कम चोरून नेली.

दुसऱ्या प्रकरणात सतीश दामोदर कट्यारमल (वय ४८, रा. ग्रीन फील्ड हाऊसिंग सोसायटी, अजमेरा कॉलनी जवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रविवारी (दि.०१) दुपारी बारा वाजता फिरण्यासाठी बाहेर गेले. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरातील देवघरात असलेल्या कपाटातून दोन लाख ३० हजार रुपये किमतीचे १३ तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी