शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तक्रार केल्याच्या रागातून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 15:23 IST

भांडणाची पाेलीस तक्रार केल्याचा राग मनात ठेवून कोयता पायावर मारून तसेच पेव्हर ब्लॉकने मारहाण करून भावांना जखमी केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे.

पिंपरी : भांडणाची पोलीस तक्रार केल्याचा राग मनात धरून उलटा कोयता पायावर मारून तसेच पेव्हर ब्लॉकने मारहाण करून भावांना जखमी केले. चिंचवडला रामनगर येथे शुक्रवारी (दि. ५) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा देवकर व पवन लष्करे (दोघेही रा. रामनगर) यांच्यासह सात ते आठ अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सचिन अंकुश कुसाळकर (वय ३८, रा. रामनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी सचिन कुसाळकर यांनी भांडणाची पोलिसांकडे तक्रार केल्याचा आरोपींना राग होता. त्यातून आरोपींनी शुक्रवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी सचिन कुसाळकर यांना शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण केली. तसेच फिर्यादी कुसाळकर यांचा भाऊ नवीन भोसले यांच्या पायावर आरोपी पवन लष्करे याने उलटा कोयता मारला. यात नवीन भोसले यांचा डावा पाय जखमी झाला. आरोपींच्या सोबत असलेल्या सात ते आठ अनोळखी जणांनी फिर्यादी सचिन कुसाळकर यांचा मावस भाऊ राहुल वेताळे यांना पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. फिर्यादी सचिन कुसाळकर व त्यांच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस