शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना अटक; पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:27 IST

चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाची कामगिरी

ठळक मुद्दे ३५ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी केला जप्त

पिंपरी : कुख्यात रावण टोळीच्या म्होरक्यासह दोघांना पोलिसांनीअटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.   विकी ऊर्फ अनिरूद्ध राजू जाधव (वय २४), मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय २२, दोघे रा. रावेत), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. झिरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तपास पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे. गुरूद्वारा चौकाकडून तहसील कार्यालयाकडे रेल्वे पटरीच्या खालून जाणाºया रोडच्या बाजूस दोन इसम संशयीतरित्या फिरत आहेत. त्यातील एका इसमाच्या कमरेला हत्यार दिसत आहे, अशी माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपी जाधव याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल मिळून आले. तसेच आरोपी हाडे याच्याकडे दोन जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांच्याकडून ३५ हजार ५०० रुपयांचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला.आरोपी जाधव हा सध्या रावण टोळीचा म्होरक्या व सराईत गुन्हेगार असून नुकताच मोक्याच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटला आहे. तसेच तो देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. तर आरोपी हाडे हा देखील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस कर्मचारी पांडुरंग जगताप, भाऊसाहेब मोईकर, स्वप्नील शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पंकज भदाणे, गोविंद डोके, अमोल माने, सदानंद रुद्राक्षे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस