तासाभरात दोन अपघात

By Admin | Updated: February 23, 2017 02:42 IST2017-02-23T02:42:57+5:302017-02-23T02:42:57+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमाटणे व ओझर्डे हद्दीत मंगळवारी एक तासात दोन अपघात

Two accidents in an hour | तासाभरात दोन अपघात

तासाभरात दोन अपघात

उर्से : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सोमाटणे व ओझर्डे हद्दीत मंगळवारी एक तासात दोन अपघात झाले. हे अपघात रा्रत्री पावणेनऊ व दहाच्या सुमारास झाले.
द्रुतगती महामार्गावर सोमाटणे पुलाजवळील बाहेर पडणाऱ्या मार्गावरुन उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रकमुळे द्रुतगती महामार्गावरील दोन वाहने या ट्रकवर आदळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. दुसरा अपघात ओझर्डे हद्दीत गाडीचा टायर फुटल्याने झाला.यामध्ये जिवितहानी झाली नाही. जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. द्रुतगती महामार्गावर बंदी असतानाही दुचाकी, ट्रॅक्टर घुसविल्याचे अनेकदा दिसले आहे. त्यामुळे अपघातही झाले आहेत. या मार्गावर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Two accidents in an hour