वाकड : गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाºया दोन अल्पवयीन आरोपींसह अन्य एक अशा तिघांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या २५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. केशव दशरथ शेटे (वय ३४, रा. परळी, बीड) या प्रमुख आरोपीसह म्हातोबानगर, वाकड येथील दोन अल्पवयीन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक निरीक्षक बालाजी पांढरे यांनी गुन्ह्याच्या तपासाची माहिती दिली. पोलीस नाईक भैरोबा यादव यांना म्हातोबानगर येथे राहणारे दोन अल्पवयीन चोरटे मौजमजेसाठी पैसे मिळविण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरी करीत असल्याची महिती मिळाली.आरोपींना पकडण्याची कारवाई पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक बालाजी पांढरे, कर्मचारी धनराज किरनाळे, दादा पवार, के. एल. बनसुडे, गणेश हजारे, एम. आर. नदाफ, श्याम बाबा यांनी केली.
चोरट्यांकडून २५ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:57 IST