शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची आज सांगता

By admin | Updated: August 10, 2015 02:54 IST

विठुरायाची भेट घेऊन परतीच्या मार्गावर निघालेला संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी पिंपरीत प्रवेशला. मोहक फुलांची बरसात

पिंपरी : विठुरायाची भेट घेऊन परतीच्या मार्गावर निघालेला संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा पालखी सोहळा रविवारी सायंकाळी पिंपरीत प्रवेशला. मोहक फुलांची बरसात, टाळ-मृदंगासह हरिनामाचा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळी सातला पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहूकडे मार्गस्थ होणार आहे. दुपारी वीणेकरी, दिंडीकरी, मानकरी यांचा सत्कार होऊन पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे. या वेळी जोगमहाराज दिंडी आणि पिंपरी गावातील भजनी मंडळाचे वारकरी पालखी सोहळ्याच्या स्वागतास गावाच्या सीमेवर आले होते. त्या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची दिंडी सहभागी झाली होती. तसेच, गावात पालखी सोहळ्याचे स्वागत करणाऱ्या कमानी लक्षवेधी होत्या, तर गावातील पालखी मार्गावर रांगोळी आणि झेंडूच्या फुलांची रांगोळी काढली होती. सोहळ्यासमोर ओम साई प्रतिष्ठान, सह्याद्री ढोलपथक, शिवतांडव ढोलपथकांचा दणदणाट सुरू होता. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर, गावातून पालखी जात असताना मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी केली जात होती. त्यानंतर सायंकाळी सहाला पिंपरी गावातील काळभैरवनाथ मंदिर येथे अभंगारतीनंतर पालखी मुक्कामासाठी थांबली. या वेळी पिंपरीकरांच्या वतीने सोहळ्यातील वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप केले. सोमवारी सकाळी सोहळा श्रीक्षेत्र देहूकडे मार्गस्थ होणार आहे. वारकऱ्यांची सेवा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सेवा, फिरते शौचालय आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्याबरोबर पिण्याच्या पाण्याचे टँकर, अ‍ॅम्ब्युलन्स व अग्निशामक वाहनांची व्यवस्था होती. (प्रतिनिधी)