शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

तुकोबारायांचे उलगडणार जीवनचरित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:46 AM

गोपाळपुरा येथे बांधलेल्या भिंतीवर साकारणार शिल्पसृष्टी

देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत गोपाळपुरा येथे नव्याने बांधलेल्या तीन मजली श्री संत तुकाराममहाराज भक्त निवासाच्या आवारातील पूरसंरक्षक भितींवर संत तुकाराममहाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंगांची शिल्पसृष्टी पालखी देहूत परतण्यापूर्वी उभारण्यात येणार आहे.राज्यातील एक वैशिष्टपूर्ण भक्त निवास होणार आहे. तीर्थक्षेत्राबरोबरच देहू हे संत संस्कृतीचे व्यासपीठ व सांस्कृतिक पर्यटनस्थळ करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडताना दिसत आहे. संत तुकाराममहाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेली निवडक १२ शिल्पे वडगाव धायरी येथील प्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी तयार केली आहेत.या शिल्पांच्या शेजारीच त्या शिल्पातील प्रसंगाबाबतचा अभंग आणि त्याबाबतची माहिती मराठी व इंग्रजी भाषेमध्ये ग्रेनाईट मार्बल वर कोरण्यात आली आहे. यातील प्रत्येक चित्र हे ६ फूट उंच व १० फूट रूंद आहेत. ही शिल्पे एफ. आर. फायबर ग्लासमध्ये तयार केली आहेत. हे मटेरियलवर ऊन व पाऊस याचा कोणताही परिणाम होत नसल्याने या टिकाऊ साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या शिल्पांमध्ये श्री संत नामदेवमहाराज हे श्री संत तुकाराममहाराजांच्या स्वप्नात येऊन साक्षात्कार दिल्याचा प्रसंग, जिजाबाई श्री संत तुकाराममहाराजांना श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर जेवन घेऊन जातात तो प्रसंग, कीर्तनात श्री संत तुकाराममहाराज व भजनात तल्लीन असलेले भक्तगण. पंढरपूरला निघालेल्या वारीचा प्रसंग, श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन प्रसंग, भामचंद्र डोंगरावर भजन करतानाचा प्रसंग, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्री संत तुकाराम महाराजांना पाठविलेला नजराना प्रसंग, शेतात राखण करताना शेतात गुरे जातात तो प्रसंग, इंद्रायणीच्या डोहात गाथा बुडवलेल्या गाथा वर आल्या तो प्रसंग, भगवान विष्णूचे नरसिंह अवतार, रामावतार, श्रीकृष्णावतार आणि विठ्ठल आवतार यांचे एकत्रित शिल्प अशी १२ शिल्पे लावण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी संस्थानने कल्पना मांडली होती व त्यासाठी २५ प्रसंगांची निवडही केली होती. मात्र निधी अभावी महत्त्वाच्या अशा केवळ १२ प्रसंगांची निवड करून ते या शिल्पसृष्टीमध्ये लावण्यात येणार आहे. ही सर्व शिल्पे तयार झाली असून, ती पालखी देहूनगरीत परत येण्यापूर्वी बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून ती आलेल्या भाविकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहेत.

टॅग्स :sant tukaramसंत तुकारामpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड