गळक्या बसमधून छत्री उघडून प्रवास

By Admin | Updated: July 20, 2015 04:02 IST2015-07-20T04:02:22+5:302015-07-20T04:02:22+5:30

वडगाव-निगडी मार्गावरील बहुसंख्य पीएमपी बसची दुरवस्था झाली आहे.काही बसच्या छतातुन मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी गळते. खिडक्याच्या

Travel by opening the umbrella through a leaky bus | गळक्या बसमधून छत्री उघडून प्रवास

गळक्या बसमधून छत्री उघडून प्रवास

वडगाव मावळ : वडगाव-निगडी मार्गावरील बहुसंख्य पीएमपी बसची दुरवस्था झाली आहे.काही बसच्या छतातुन मोठ्या प्रमाणात पावसाने पाणी गळते. खिडक्याच्या काचा तुटल्याने पावसाचे पाणी बसमध्ये येत असल्याने प्रवाशांना भिजत किंवा छत्री व रेनकोटचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे. वाहकानांही भिजत तिकिट द्यावे लागत आहे.
जुन्या बस वडगाव-निगडी मार्गावर वापरल्या जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या मार्गावर नविन बस सुरु करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव येथे सर्वच शासकीय कार्यालय, बॅक, शाळा, महाविद्यालय व खासगी कार्यालय आहेत. निगडी बस दर १५ मिनिटाला असल्याने शेकडो विद्यार्थी, कामगार, महिला व नागरीक प्रवास करतात. या मार्गाला जुनाट मोडकळीस आलेल्या पीएमटी बसचा उपयोग केला जात असल्याने त्यांचा मोठा आवाज येतो. अनेकदा या बस बंंद मध्येच पडतात. यामुळे प्रवासांच्ी गैरसोय होते.
पावसाळ्यात या बसच्या छतातुन मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने आसनावर पाणी साठते. अनेक आसनांची कव्हर फाटली असल्याने आत पाणी झिरपते. त्या मुळे तेथे बसता येत नाही. खिडक्याच्या काचा फुटल्याने त्या खिडक्यातुन पावसाचे पाणी आत येत असल्याने प्रवसी कोणत्या जागेवर बसावे या संभ्रमात असतात.
नाईलाजाने प्रवासी पीएमटी बसमध्ये छत्री उघडुन अंगावर घेऊन बसलेले असतात. काही प्रवासी अंगावर घातलेले रेनकोट तसेच अंगात ठेवुन प्रवास करतात. या गळक्या बसमुळे प्रवासाचे कपडेच नव्हे तर जवळचे साहित्य भिजत असल्याने प्रवासांचे नुकसान होत आहे. पीएमटी बसमध्ये छत्री उघडुन व रेनकोट अंगात घालुन बसलेले प्रवासी बसलेले पाहुन नविन प्रवासाला गोंधळतात. त्यांच्याही अंगावर छतातुन पाणी अंगावर गळायला लागताच ते सावध होतात. काही प्रवासी अशा गळक्या प्रवास टाळत आहेत. गळक्या बसमध्ये वाहकाला प्रवासांना तिकिट देताना कसरत करावी लागते. वाहकाचा पाय घसरुन बसमध्ये पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. चालकही अगांवर पाणी पडत असल्याने भिजत
आहे. गळक्या व मोडकळीस आलेल्या बसमधुन प्रवास करण्याचे अनेक प्रवासी टाळुन खाजगी वाहनातुन जात आहेत. प्रवास करताना भिजल्याने प्रवासी आजारी पडत आहेत.(वार्ताहर)

Web Title: Travel by opening the umbrella through a leaky bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.