शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पिंपरी-चिंचवड दलातील २७ पोलिस निरीक्षकांची बदली; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदल्या

By नारायण बडगुजर | Updated: January 31, 2024 16:59 IST

विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी (दि. ३०) बदलीचे आदेश दिले आहेत....

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. पिंपरी - चिंचवड शहरातून २७ पोलिस निरीक्षक इतर ठिकाणी गेले असून राज्याच्या विविध घटकांमधून २४ पोलिस निरीक्षक पिंपरी -चिंचवड शहरात आले आहेत.

स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलिस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात नमूद आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के एम मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंगळवारी (दि. ३०) बदलीचे आदेश दिले आहेत.

बदलूल गेलेले पोलिस निरीक्षक  

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेले पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, शैलेश गायकवाड, रणजीत सावंत, दीपाली धाडगे, प्रसाद गोकुळे, सुनील पिंजन, रामचंद्र घाडगे, विश्वजीत खुळे, मच्छिंद्र पंडित, बाळकृष्ण सावंत, प्रकाश जाधव, किशोर पाटील, रूपाली बोबडे, अरविंद पवार, युनूस मुलानी आणि सोन्याबापू देशमुख यांची नागपूर शहर पोलिस दलात बदली झाली. तसेच पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, शंकर डामसे, शंकर बाबर, ज्ञानेश्वर साबळे, दीपक साळुंखे आणि सुनील तांबे यांची ठाणे शहर पोलिस दलात बदली झाली. पोलिस निरीक्षक अजित लकडे, दिलीप शिंदे आणि शहाजी पवार यांची सोलापूर शहर पोलिस दलात बदली झाली. पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांची छत्रपती संभाजी नगर शहर तर दशरथ वाघमोडे यांची गडचिरोली येथे बदली झाली. 

पिंपरी चिंचवड दलात आलेले पोलिस निरीक्षक 

नागपूर शहर दलातील पोलिस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, विश्वनाथ चव्हाण, विनोद चौधरी, बापू ढेरे, दीपक गोसावी, प्रवीण कांबळे, प्रदीप राईनवर, अमित डोळस, संग्राम शेवाळे, अमोल देशमुख, राजेंद्रकुमार सानप, गणेश जामदार, नितीन फटांगरे, बबन येडगे, भारत शिंदे, ऋषिकेश घाडगे, भीमा नारके, भारत कराडे आणि गोरख कुंभार हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात बदली होऊन आले. तसेच डीआयजी गडचिरोलीचे पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, गडचिरोलीचे निरीक्षक संदीप पाटील, अमरावती शहर दलाचे विजयकुमार वाकसे, ठाणे शहर दलाचे मालोजी शिंदे, धनंजय कापरे हे अधिकारी पिंपरी-चिंचवड पोलिस दलात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड