लांडगे लिंबाची तालीम प्रथम

By Admin | Updated: January 23, 2016 02:20 IST2016-01-23T02:20:19+5:302016-01-23T02:20:19+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २०१५मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

Training of wolf lemon first | लांडगे लिंबाची तालीम प्रथम

लांडगे लिंबाची तालीम प्रथम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २०१५मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये धार्मिक देखावा गटात डी. वॉर्ड फ्रेंड सर्कल, (पिंपरी कॅम्प), जिवंत देखावा गटात एस.के.एफ. गणेशोत्सव मंडळ (चिंचवड), सामाजिक देखावा गटात लांडगे लिंबाची तालीम मंडळ (भोसरी) या मंडळांनी प्रथम क्रमांक पटकावला. महापौर शकुंतला धराडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला.
धार्मिक देखावा गटात डी. वॉर्ड फ्रेंड सर्कल (पिंपरी कॅम्प ) यांच्या ‘श्री गुरुदेवदत्त दर्शन’ या देखाव्याने प्रथम, पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ (भोसरी) यांच्या ‘रावणाचे गर्वहरण’ या देखाव्याने द्वितीय, जय हिंद मित्र मंडळ (आकुर्डी) यांच्या ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या देखाव्याने तृतीय क्रमांक पटकावला. तर श्री संत सावतामाळी तरुण मंडळ (जाधववाडी) व समस्त गव्हाणे मित्र मंडळ (भोसरी) यांना विभागून चतुर्थ क्रमांक, जय बजरंग तरुण मंडळ (निगडी) व कीर्तीनगर मित्र मंडळ (नवी सांगवी) यांना विभागून पाचवा क्रमांक देण्यात आला. फुगे-माने तालीम मंडळ, भारतमाता तरुण
मंडळ (पिंपरी), कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ (भोसरी), श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ (पिंपळे गुरव),
श्री तुळजामाता मित्र मंडळ
(आकुर्डी), शिवशक्ती मित्र मंडळ (आकुर्डी) हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.
सामाजिक देखावा गटात लांडगे लिंबाची तालीम मंडळ (भोसरी) यांच्या ‘छत्रपती शिवराय मानवता व समानतेचे पुरस्कर्ते’ या देखाव्याने प्रथम, श्रीराम मित्र मंडळ (भोसरी) यांच्या ‘अग्निपंख’ या देखाव्याने द्वितीय, श्री लक्ष्मीनगर सार्वजनिक मित्र मंडळ (चिंचवड) यांच्या ‘स्त्रीभ्रूणहत्या’ या देखाव्याने तृतीय क्रमांक पटकावला. तर ईगल मित्र मंडळ (फुगेवाडी) व श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ (आकुर्डी) यांना विभागून चतुर्थ, उत्कृष्ट तरुण मंडळ (चिंचवडगाव) व हनुमान तरुण मित्र मंडळ (चिंचवडगाव) यांना विभागून पाचवा क्रमांक देण्यात आला. आझाद मित्र मंडळ (काळेवाडी), संतनगर मित्र मंडळ (प्राधिकरण), राणा प्रताप मित्र मंडळ
(चिंचवड), अमरदीप तरुण मंडळ (पिंपरी), लोंढे तालीम मित्र मंडळ (भोसरी) हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.
गणेशोत्सव सजावट स्पर्धेसाठीचे परीक्षक एस. आर. शिंदे, श्रावण जाधव व मिलिंद वैद्य यांनी हा निकाल महापौर शकुंतला धराडे यांच्याकडे सुपूर्द केला. (प्रतिनिधी)

Web Title: Training of wolf lemon first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.