रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल

By Admin | Updated: November 10, 2016 02:12 IST2016-11-10T02:12:43+5:302016-11-10T02:12:43+5:30

मला कर्नाटकात जायचे आहे, अर्धातास रांगेत उभे राहूनही मला तिकीट मिळत नाही. माझ्याकडे केवळ ५०० रुपयांची नोट आहे.

Train Status | रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल

रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे हाल

पुणे : मला कर्नाटकात जायचे आहे, अर्धातास रांगेत उभे राहूनही मला तिकीट मिळत नाही. माझ्याकडे केवळ ५०० रुपयांची नोट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे या नोटा देऊनही तिकीट मिळत नाही. त्यामुळे बाहेरगावाहून पुण्यात येणाऱ्या आणि पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाने नागरिकांना पूर्वकल्पना देऊन हा निर्णय घ्यायला हवा होता, अशा प्रतिक्रिया पुणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनी बुधवारी व्यक्त केल्या.
केंद्र शासनाने चलनातील एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला; मात्र बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल होऊ नये, या उद्देशाने येत्या ११ नोव्हेंबरपर्यंत १००० व ५०० च्या नोटांवर तिकीट मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे; मात्र प्रत्येक प्रवासी १००० आणि ५०० रुपयांची नोट घेऊन आल्यामुळे सर्वांनाच सुटे पैसे देणे शक्य होत नाही. परिणामी काही प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याचे दिसून आले. रिक्षाचालकांना देण्यासाठी सुटे पैसे नसल्याने प्रवाशांना पुण्यात स्वत:च्या किंवा पाहुण्यांच्या घरी पोहोचण्यासाठी अडचणी येत आहे.
रेल्वेस्टेशनवर तिकीट खिडक्यांसमोर रांगेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना अर्धातास रांगेत उभे राहिल्यानंतर सांगितले जाते. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच तिकीट काढण्यासाठी मंगळवारी रात्री पासूच अनेक प्रवाशांनी मुद्दाम १००० व ५०० रुपयांच्या नोटा तिकीट काढण्यासाठी दिल्या. त्यामुळे अवघ्या दोन तासांत माझ्याजवळील २० हजार रकमेच्या १००रुपयांच्या नोटा संपल्या, काही प्रवासी स्वत:जवळील सुटे पैसे असूनही तिकिटासाठी देत नाहीत, असे रेल्वेस्टेशनवर नियुक्त केलेल्या ‘फॅसिलेटर’ने सांगितले.

Web Title: Train Status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.