वाहतुकीचा खेळखंडोबा

By Admin | Updated: October 29, 2016 04:28 IST2016-10-29T04:28:51+5:302016-10-29T04:28:51+5:30

दिवाळीचा उत्सव कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी उद्योगनगरीतून गावी जाण्यासाठी निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, पिंपरी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर रीघ लावली.

Traffic window | वाहतुकीचा खेळखंडोबा

वाहतुकीचा खेळखंडोबा

पिंपरी : दिवाळीचा उत्सव कुटुंबासोबत साजरा करण्यासाठी उद्योगनगरीतून गावी जाण्यासाठी निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी, हिंजवडी, पिंपरी परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर रीघ लावली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.
शनिवारपासून दिवाळीचा मुख्य उत्सव सुरू होत आहे़ त्यामुळे उद्योगनगरीच्या अनेक भागातील कर्मचारी दुचाकी, चारचाकी, खासगी वाहने, बस, एसटीने घरी निघाले आहेत़ शुक्रवारी सकाळपासूनच रस्त्यावरील गर्दीला सुरुवात झाली आहे़ तसेच मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अनेक मोटारगाड्यांची रीघ लागत आहे़ दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या वाहनांची गर्दी अधिकच वाढत आहे़ सकाळी काही चौकात वाहतूक शाखेचा कर्मचारी हजर नसल्यामुळे वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रासपणे तोडून वाहन दामटताना दिसले. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic window