पिंपरी : हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याने ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करत मोटारीची तोडफोड केली. हा प्रकार थेरगाव मधील बापूजी बुवा कॉर्नरवर आज (गुरुवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.बालाजी किसन सगर (वय ३८ , रा. इंद्रायणी नगर , थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर उर्फ विनोद सातपुते (रा. गणराज कॉलनी, थेरगाव) याच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सगर ट्राफिक वॉर्डन म्हणून वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी माध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते आपल्या मोटारीने घरी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध सातपुते हा त्याच्या तीन मित्रांसोबत बोलत थांबला होता. रस्त्यावरून जाण्यासाठी सगर यांनी हॉर्न वाजविला. त्यावरून सातपुते आणि सगर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. सातपुते याने त्याच्या तीन मित्रांना घेऊन सगर यांच्या मोटारीचा पाठलाग केला. मोटारीवर दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. मोटारीवर दगडफेक झाल्याने सगर यांनी मोटारीतून पळ काढला, त्यामुळे ते बचावले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.
हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याची ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 17:08 IST
रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या आरोपींनी ट्राफिक वार्डनला हॉर्न वाजविल्याच्या रागातून शिवीगाळ करत त्याच्या मोटारीची तोडफोड केली आहे.
हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याची ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ
ठळक मुद्देयाप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल