शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीला अडथळा; साहित्य रस्त्यावर पडल्याने अपघाताचा वाढला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 02:57 IST

जुना मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे भरावाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या कामाचे आरई पॅनल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

कामशेत : येथील जुना मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे भरावाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या कामाचे आरई पॅनल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय एखादे वाहन त्याला धडकून अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या उड्डाणपुलाचे काम मुदत संपूनही पूर्ण झाले नाही. शिवाय या कामाच्या संदर्भात मुख्य महामार्ग सेवारस्त्याने वळवण्यात आला. मात्र सेवारस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण होत आहे. त्यात सेवा रस्त्याच्या बाजूला करण्यात आलेल्या सांडपाण्याच्या गटारीवर चेंबर लावले नसल्याने उघड्या आहेत. पवनानगर फाटा पुढील दोन महिन्यांसाठी बंद केल्याने स्थानिक वाहनचालकांना विरुद्ध दिशेने मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे कामशेतच्या उड्डाणपुलाचे काम अजून किती दिवस सुरू राहणार असल्याचा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाहनचालकांना मोठा वळसा मारावा लागत आहे. या कामाचे तीन तेरा वाजले असून स्थानिक नागरिक, वाहनचालक व महामार्गावरील वाहतुकीस मोठा त्रास सहन करावा लागत आहे.आरई पॅनलची पडझड सुरूउड्डाणपुलाच्या कामासाठी भरावाच्या बाजूला लावण्यात आलेल्या आरई पॅनलची पडझड सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी सेवारस्त्यावर हे पॅनल आल्याने याचा वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. एखादे वाहन या रस्त्यावर आलेल्या पॅनलला धडकल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामशेत शहरात सुरू असलेल्या या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात अनेक त्रुटी असून, मुदत संपूनही हे काम पूर्ण झाले नसल्याने या कामाच्या संदर्भात शंका निर्माण झाली आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा