पर्यटनाला मिळणार चालना

By admin | Published: March 20, 2017 04:26 AM2017-03-20T04:26:54+5:302017-03-20T04:26:54+5:30

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मावळातील कामशेत रेल्वे गेट ते खांडशी व पवन मावळातील आर्डव फाटा ते ब्राम्हणोली रस्ता

Tourism will get promoted | पर्यटनाला मिळणार चालना

पर्यटनाला मिळणार चालना

Next

वडगाव मावळ : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मावळातील कामशेत रेल्वे गेट ते खांडशी व पवन मावळातील आर्डव फाटा ते ब्राम्हणोली रस्ता तयार करण्यासाठी ६ कोटी ४८ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्यांमुळे मावळातील पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पार पडले. रेल्वे गेट ते खांडशी या ५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी अंदाजपत्रकीय ३ कोटी रुपये तर आर्डव फाटा ते ब्राम्हणोली या सात किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३ कोटी ४८ लक्ष रुपये खर्च होणार आहे. या रस्त्यामुळे पवन मावळातील पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रस्त्याच्या कडेला पर्यटकाना सेवा पुरवून रोजगार मिळणार असल्याचे आमदार भेगडे यांनी सांगितले.
खांडशी रस्त्यामुळे विथार्थ्यांची पायपीट थाबणार असून दुग्ध व्यवसायिकांना दुधाची ने-आण करणे सोयीस्कर होणार आहे. सदर रस्ता १० वषार्पूर्वी टाटा कंपनीच्या मालकीचा होता. परंतु भेगडे यांच्या प्रयत्नातून रस्ता प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला. या भागातील वनविभाग हदीतील रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याचे काम पूर्ण करून गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर यांनी सांगितले.
उपसभापती शांताराम कदम, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोट्कुले, जितेंद्र बोत्रे, एकनाथ टिळे, पांडुरंग ठाकर, रवींद्र घारे, राजाराम शिंदे, संतोष जाभूळकर, गणेश गायकवाड, निकिता घोट्कुले, सुवर्णा कुंभार, ज्योती शिंदे, जिजाबाई पोटफोडे, अनंता कुडे, रेवाशेठ रावळ, समीर हुलावळे, विजय टाकवे, सरपंच उज्ज्वला शिरसाट, उपसरपंच शिवाजी बैकर आदींच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. (वार्ताहर)

Web Title: Tourism will get promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.