शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सलून सुरु करण्यासाठी बायकोचा छळ ; नवऱ्यावर गुन्हा दाखल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 18:54 IST

सलून सुरु करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आतील घराबाहेर हाकलून तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

पिंपरी : सलून सुरु करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आतील घराबाहेर हाकलून तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. हा प्रकार मे ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडला.

याप्रकरणी 20 वर्षीय विवाहितेने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती मयूर सोनवणे, सासू रेणुका सोनवणे (दोघे रा. वरसगाव पानशेत), नणंद कोमल तावरे (रा. वरसगाव पानशेत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याचे 20 मे 2019 रोजी लग्न होणारे होते. काही घरगुती अडचणींमुळे ते लग्न होऊ शकले नाही. मात्र, ठरलेल्या दिवशी लग्न होण्यासाठी आरोपी मयूरच्या घरच्यांनी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी फिर्यादी महिलेच्या घरच्यांना विनंती केली. मुलगा सलूनचा व्यवसाय करत असून तो न-हे आंबेगाव येथे राहत असल्याचे मुलीच्या घरच्यांना सांगण्यात आले. त्यावर महिलेच्या घरच्यांनी संमती दर्शवून फिर्यादी महिला आणि आरोपीचा विवाह केला. विवाह झाल्यानंतर तीन महिने संसार व्यवस्थित चालला.

त्यानंतर, फिर्यादी यांना आरोपी पतीचा सलूनचा व्यवसाय नसून तो मामाच्या दुकानात काम करत असल्याचे समजले. पतीला दारूचे व्यसन असल्याचेही समजले. याबाबत फिर्यादिंनी विचारणा केली असता त्यांना आरोपी पतीने मारहाण केली. फिर्यादीला घराबाहेर ठेवले. विवाहितेकडे सलून दुकान सुरु करण्यासाठी दोन लाख रुपये माहेरहून घेऊन येण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण केली. आरोपी पती, सासू आणि नणंद या तिघांनी मिळून फिर्यादी महिलेला घरगुती कारणावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला.वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :dowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस