शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शौचालय सर्वेक्षण; मागितली मुदतवाढ

By admin | Updated: July 28, 2015 00:46 IST

केंद्र शासनाच्या मिळालेल्या आदेशानुसार वैयक्तिक शौचालयांचे सर्वेक्षण १५ जुलैपर्यंत करण्याचा आदेश महापालिके ला देण्यात आला होता. तब्बल २० दिवस उलटून गेल्यानंतरही सर्वेक्षण

पिंपरी : केंद्र शासनाच्या मिळालेल्या आदेशानुसार वैयक्तिक शौचालयांचे सर्वेक्षण १५ जुलैपर्यंत करण्याचा आदेश महापालिके ला देण्यात आला होता. तब्बल २० दिवस उलटून गेल्यानंतरही सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सर्वेक्षणासाठी सर्व प्रभागांना महापालिके ने मुदत वाढवून दिली आहे. राज्य शासनाकडे अहवाल सादर करण्यास महापालिका प्रशासनास विलंब झाला आहे. कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणात टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे.शालाबाह्य सर्वेक्षणासोबतच वैयक्तिक शौचालयांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिक ांना देण्यात आले होते. मात्र, शालाबाह्य सर्वेक्षणानंतर काही दिवसांनी वैयक्तिक शौचालय सर्वेक्षण सुरू झाले. मतदार दुबार नोंदणीचेही सर्वेक्षण सुरू झाल्यामुळे कर्मचारीवर्गानेही सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष केले. शालाबाह्य सर्वेक्षण ज्या प्रकारे चालढकल करत केले गेले, तसेच वैयक्तिक शौचालयांचे सर्वेक्षण केले जात आहे. यामुळे सर्वेक्षणाची मुदत २२ जुलैपर्यंत वाढविण्यात आली. तर, मतदार दुबार नोंदणीस प्रतिसादच मिळाले नसल्याचे काही अधिकारीवर्गाने सांगितले.वैयक्तिक शौचालय सर्वेक्षणासाठी कर्मचारी संख्या अपुरी व नेमून दिलेले प्रगणकही गैरहजर राहिले होते. यामुळे सर्वेक्षणात अडचणी निर्माण झाल्या. प्रभागस्तरावर प्रत्येकी १५० कर्मचारी सर्वेक्षणास आहेत. सहा प्रभागांत ९९४ कर्मचारी पूर्ण दिवस काम पाहत आहेत. शालाबाह्य सर्वेक्षणासाठी चार ते साडेचार हजार कर्मचारी होते. यामुळे सर्वेक्षणास वेळ लागल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.यामध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, मोबाइल नंबर, वैयक्तिक शौचालय आहे की नाही, नसल्यास सार्वजनिक व एकत्रित शौचालयाची नोंद घेतली जात आहे. तसेच, उघड्यावर शौचालयाचा वापर करणारे किती नागरिक आहेत, अशा कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी घेतली जात आहे. यातही नागरिक माहिती देण्यासाठी दुर्लक्ष करीत आहेत. कर्मचाऱ्यांना अपुरी माहिती मिळत आहे. (प्रतिनिधी)वैयक्तिक शौचालयांच्या सर्वेक्षणाची माहिती अद्यापपर्यंत प्रभागस्तरावरून प्राप्त झालेली नाही. शहरात चार ते साडेचार लाख लोकांच्या घरोघरी सर्वेक्षण करायचे आहे. यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. माहिती देतानाही नागरिकांनी सहकार्य करायचे आहे. याकरिता कर्मचारीवर्गाला सर्वेक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सर्वेक्षणाचे काम लवकरच पूर्ण होईल. - दिलीप गावडे, सहायक आयुक्त शौचालयासाठी हमीपत्र वैयक्तिक शौचालयाच्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य शासनाकडे गेल्यानंतर आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज अधिकारी यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच, अनुदानाचा विनियोग होऊ नये यासाठी नागरिकांकडून शौचालयाचे हमीपत्र भरून घेतले जाणार आहे. यापैकी काही रक्कम नागरिकांनी स्वत:च्या खिशातून भरावयाची आहे. सदर शौचालय व त्या व्यक्तीचा फोटो शासनाला पाठवला जाणार आहे.