सखींसाठी आज नाट्य मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:13 IST2017-08-02T03:13:22+5:302017-08-02T03:13:22+5:30

लोकमत सखी मंच आणि डॉ. गाडेज् डायबेटिस अ‍ॅण्ड वुमन्स् क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सखींसाठी खास दोन अंकी ‘चांगल्या बायका दुसºयांच्या’ या विनोदी नाटकाची मेजवानी आयोजित केली आहे.

Today's Dancing Party for the Sakshi | सखींसाठी आज नाट्य मेजवानी

सखींसाठी आज नाट्य मेजवानी

पिंपरी : लोकमत सखी मंच आणि डॉ. गाडेज् डायबेटिस अ‍ॅण्ड वुमन्स् क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने सखींसाठी खास दोन अंकी ‘चांगल्या बायका दुसºयांच्या’ या विनोदी नाटकाची मेजवानी आयोजित केली आहे.
‘जिव्हाळा’ची निर्मिती असणा-या नाटकात महिलांना माहीत असलेलं नवºयाच गुपित मोठ्या विनोदी आणि मिश्किल शैलीत मांडले आहे. संतोष पवार, नीता दोंदे, नंदू गाडगीळ यांच्या सकस अभिनयाने नटलेल्या या नाटकाचा प्रयोग चिंचवड येथे आज (२ आॅगस्ट) सायंकाळी पाच वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केला आहे. या नाट्य प्रयोगापूर्वी ‘मधुमेहचे आधुनिक ज्ञान... काळाची गरज’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच सभासद व त्यांच्या परिवारासाठी हा प्रयोग असून प्रवेश नि:शुल्क आहे.
चंदुकाका सराफ अ‍ॅण्ड प्रा. लि. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

Web Title: Today's Dancing Party for the Sakshi