शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:23 IST

- महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे.

पिंपरी : महापालिकेच्या तळमजल्यावरील मुख्य लेखा व वित्त विभागाच्या कार्यालयात ठेकेदाराकडून पालिकेचा कर्मचारी पैसे घेताना व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. या प्रकरणानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी विभागात गुरुवार (दि.३१) पासून सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. त्यामुळे विभागात काेणीही येऊ नये, सहज पैसे घेता यावेत, यासाठीच सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे.

अधिकारी आणि संबंधित लिपिक, लेखा अधिकाऱ्याचा वाटा दिल्याशिवाय फाइलच पुढे जात नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सातत्याने हाेत असते. बुधवारी (दि.३०) लेखा व वित्त विभागात एक ठेकेदार फाइलसाठी पैसे देत असल्याचा आणि कर्मचारी पैसे स्वीकारत असल्याचा व्हिडीओ साेशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजाराे लाेकांनी पाहिला असून महापालिकेच्या कारभारावर नागरिक टीका करत आहेत.

लेखा व वित्त विभागात बिलासंदर्भात अनेक ठेकेदार येत असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. लेखा विभागातील कर्मचारी पैसे घेतानाचा साेशल मीडियावर व्हायरल हाेणाऱ्या व्हिडीओ संदर्भात काेणाचीही लेखी तक्रार अद्याप आली नाही. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल. - प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका. लेखा विभागातील पैसे घेतानाचा व्हायरल हाेणारा व्हिडीओ आपण पाहिला नाही. व्हिडीओ पाहून याेग्य ती कारवाई केली जाईल.- मनाेज लाेणकर, सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग.

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBribe Caseलाच प्रकरण