मतदार यादीबाबत हरकतींसाठी मुदत
By Admin | Updated: December 1, 2015 03:37 IST2015-12-01T03:37:43+5:302015-12-01T03:37:43+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ (अ) काळभोरनगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मतदार यादीबाबत हरकतींसाठी मुदत
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ (अ) काळभोरनगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीबाबत हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या प्रभागाचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या झाल्याने ही जागा रिक्त आहे. या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप यादी तयार केली असून, हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. पिंपरीतील मुख्य प्रशासकीय इमारत, निगडी प्राधिकरणातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डीतील सहायक मंडलाधिकारी यांचे विभागीय कार्यालय, प्राधिकरणातील तहसील कार्यालय या ठिकाणी ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान हरकती व सूचना सादर करता येऊ शकतात. दरम्यान, शहरातील विधानसभा मतदारसंघनिहायी मतदार यादी बनविण्याचे काम सुरू आहे. परंतु
या मोहिमेला अंत्यत थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे येथील काही अधिकऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)