शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

...तोवर पिंपरी चिंचवडला दिवसाआडच पाणी येणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 21:30 IST

दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन तूर्तास कायम राहणार आहे.

पिंपरी :  पाणीपुवठ्यात कोणतीही कपात केलेली नसून औद्योगिकनगरीची वाढती लोकसंख्येमुळे वाढीव पाणी उपलब्ध होईपर्यंत दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन कायम ठेवण्यात येईल,  असे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन तूर्तास कायम राहणार आहे.पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या  २३ लाखांच्या जवळपास आहे.  मावळातील पवना धरणातून शहराला  पाणीपुरवठा केला जातो. धरणातून नदीत आणि रावेत येथील जलउपसा केंद्रातून पाणी उचलण्यात येते. त्यानंतर प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागात पुरविण्यात येते. शहरासाठी धरणात दिवसाला ४८० एमएलडी पाणी उचलण्याची परवानगी आहे. त्यासाठी आरक्षणापेक्षा अधिक वीस एमएलडी पाणी उचलले जात आहे. पवना धरणातून दररोज ५०० एमएलडी पाणीउपसा केला जातो.  शहरात एक लाख ५० हजार नळजोड आहेत. त्यापैकी गळतीचेही प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ६०० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी वितरणावर ताण येत आहे.  पाणी नियोजनासाठी दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन दोन महिन्यापूर्वी केले होते. दोन महिन्यांसाठी पाणी पुरवठा विभागाला उपाययोजनांसाठी सूचना केल्या होत्या. मागील शनिवारी दोन महिने पूर्ण झाले. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने पुढील आठवड्यात दिवसाआड पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेऊ असे माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे दिवसाआड पाणी कायम राहणार की नियमितपणे पाणीपुरवठा होणार? याबाबत उत्सुकता होती. याबाबत आयुक्तांनी दिवसाआड पाणी नियोजन यापुढेही कायम ठेवणार आहे, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘हिवाळ्यात पाण्याचा वापर कमी होतो. त्यामुळे नियोजन हे फक्त दिवसाआड केले होते. नागरिकांना देण्यात येणाºया पाण्यात कोणतीही कपात केली नव्हती. महापालिका पवना नदीतून दररोज पाचशे एमएलडी पाणी उचलते.

तेवढेच पाणी आपण सध्या शहरात पुरवित आहोत. नियमित पाणीपुवठ्यात दिवसाला पाचशे एमएलडी पाणी संपूर्ण शहराला पुरविण्यात येत होते. त्यामुळे पाणी कमी दाबाने येणे अशा अनेक तक्रारी होत्या. दिवसाआड नियोजनामुळे शहराच्या अर्ध्या भागात आरक्षणाएवढे पाणी पुरविता येत होते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या होत्या. महापालिकेस अतिरिक्त तीस एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. अतिरिक्त पाणी उपलब्ध झाल्यास पाणी पुरवठा विभागाचा आढावा घेऊन सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून दिवसाआड पाण्याबाबतचे धोरण ठरविण्यात येईल.’’

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी