शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad| सावत्र पित्याने केला ३ वर्षांच्या चिमुरडीचा खून; चिंचोलीतील धक्कादायक घटना

By नारायण बडगुजर | Updated: June 14, 2023 19:59 IST

मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण करत तिला भिंतीवर आपटले...

पिंपरी : तीन वर्षांची मुलगी रडत असल्याने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचे रडणे थांबले नाही. त्यामुळे रागाच्या भरात सावत्र पित्याने तिला मारहाण केली. तसेच तिला भिंतीवर आपटले. यात मुलीचा मृत्यू झाला. चिंचोली येथे सोमवारी (दि. १२) ही घटना घडली.

महादेव नारायण गायकवाड (वय २२, रा. चिंचोली) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी मंगळवारी (दि. १३) फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची मुलगी गुड्डी (वय ३) ही रडत होती. त्याला याचा राग आला व त्याने मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण करत तिला भिंतीवर आपटले. यात तिचा मृत्यू झाला. मात्र, तिचा जीव गेल्याचे लक्षात आले नाही. आरोपीने आणि मुलीच्या आईने मुलीला रुग्णालयात नेले. मुलगी आजारी असल्याचे त्यांनी डाॅक्टरांना सांगितले. मात्र, मुलीचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले.

मुलीचा मृत्यू झाल्याबाबत रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलीचे शवविच्छेदन केले असता, मुलीच्या शरीरांतर्गत दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांकडे याबाबत चौकशी केली. त्यावेळी सावत्र वडिलांनी मुलीला पोटात मारहाण करून भिंतीवर आपटल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सावत्र वडिलांना अटक केली. 

दोन महिन्यांपूर्वी झाली होती भेट

महादेव गायकवाड हा मूळचा छत्रपती संभाजी नगर येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून तो त्याच्या वडिलांसह चिंचोली येथे राहण्यास आहे. महादेव आणि त्याचे वडील हे दोघेही पुणे स्टेशन येथे साफसफाईचे काम करतात. दोन महिन्यांपूर्वी तीन वर्षीय चिमुरडी आणि तिची आई पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले होते. त्यावेळी महादेव याच्या वडिलांनी त्या दोघींना चिंचोली येथे घरी आणले. मुलगा महादेव याच्यासोबत चिमुरडीच्या आईचे लग्न लावून देऊ, अशी बोलणी त्यांनी केली. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून चिमुरड्या मुलीची आई आणि महादेव हे दोघेही पती-पत्नीसारखे राहत होते.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड