शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बस प्रवासात चोरी करणाऱ्या तिघांना अटक ; तीन लाख ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:27 IST

एसटी, पीएमपीएमएल बस, रिक्षा अशा प्रवासात करायचे चोरी

ठळक मुद्देपाच गुन्हे उघड : भोसरी पोलिसांची कारवाई 

पिंपरी : एसटी, पीएमपीएमएल बस, रिक्षा अशा प्रवासात प्रवाशांचा किमती ऐवज लंपास करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहेत. पाच गुन्हे उघडकीस आले असून भोसरीपोलिसांनी ही कारवाई केली. सोनी लखन सकट (वय २२), भाग्यश्री जितेश कसबे (वय २८) व सुनील श्रीकांत सोनवणे (तिघे रा. विश्रांतवाडी, पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासात दागिने चोरी झाल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास करत असताना कर्मचारी बाळासाहेब विधाते आणि सागर जाधव यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मालकाची ओळख पटवली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन महिला साथीदारांच्या मदतीने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांचाकडून तीन लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, संतोष महाडिक, संदीप जोशी, गणेश हिंगे, आशिष गोपी, सुमित देवकर, सागर भोसले, विकास फुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीtheftचोरीPoliceपोलिस