क्रेन अंगावर पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 01:53 IST2018-06-22T01:53:06+5:302018-06-22T01:53:06+5:30

बांधकाम साईटवर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर बांधकामासाठी सिमेंट, वाळू असा माल वाहतूक करणारे क्रेन अंगावर पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Three laborers die due to cramps | क्रेन अंगावर पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू

क्रेन अंगावर पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू

पिंपरी : बांधकाम साईटवर इमारतीच्या सहाव्या मजल्यावर बांधकामासाठी सिमेंट, वाळू असा माल वाहतूक करणारे क्रेन अंगावर पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास दिघी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग बसप्पा चव्हाण (वय ३५), भगवान गायकवाड (वय २९), अमर राठोड (वय २८) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. डुडुळगाव येथील सहा मजली इमारतीचे गृह प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते. त्या वेळी अचानक सहाव्या मजल्यावर वाळू आणि सिमेंट घेऊन जाणारी क्रेन वायर रोप तुटून खाली कोसळली. बिगारी, गवंडी काम करीत असललेले तीन कामगार गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Three laborers die due to cramps