शहरात चार अपघातांमध्ये तीन जण ठार; दोन जखमी

By Admin | Updated: August 3, 2015 04:19 IST2015-08-03T04:19:40+5:302015-08-03T04:19:40+5:30

इंद्रायणीनगर आणि पिंपरी, चिंचवड येथे शनिवार आणि रविवारी झालेल्या चार अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दुचाकीला

Three killed in four accidents in city; Two injured | शहरात चार अपघातांमध्ये तीन जण ठार; दोन जखमी

शहरात चार अपघातांमध्ये तीन जण ठार; दोन जखमी

पिंपरी : इंद्रायणीनगर आणि पिंपरी, चिंचवड येथे शनिवार आणि रविवारी झालेल्या चार अपघातात मायलेकासह चौघांचा मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या वाघोलीतील अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला. मृतात संगीता शिवाजी घोडके (वय ४३), श्रेयस शिवाजी घोडके (वय ११, दोघे रा. वाघोली) या मायलेकांचा, तर ट्रकने ठोकरल्याने चिंचवड स्टेशन येथे गंगाराम यशवंत भोपवे (वय ५६, रा. रुपीनगर) यांचा, तर दोन दुचाकी धडकून जावेद जब्बार आलम सय्यद (वय १८, रा. ढवळे वस्ती, मुंढवा) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दारूच्या नशेतील एकाने दोन दुचाकींना धडकून दोघेजण जखमी केले.
दोन दुचाकींची धडक
पुणे -मुंबई रस्त्यावरील चिंचवड स्टेशन येथील मेगा मार्टसमोर शनिवारी दुपारी बाराला अहमद आलम हा भरधाव जात असताना समोरून जाणाऱ्या मोटारीला ओव्हरटेक करून चुकीच्या दिशेने जाताना रोहित पालांडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे सय्यदच्या मागे बसलेल्या जावेद आलम गंभीर जखमी झाला. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रोहित पालांडे (वय २४, रा. चतु:शृंगी) याने फिर्याद दिली आहे. अहमद समीर आलम (वय २०, रा. ढवळे वस्ती, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केली आहे.
चालकाला पाठलाग करून पकडले
पिंपरी खराळवाडी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीच्या विरुद्ध बाजूला रविवारी दुपारी दोन दुचाकींना धडक देऊन पळून जाणाऱ्या एका मोटारचालकाला एका नागरिकाने पाठलाग करून पकडले. मोटारचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. एका मोटारीने (एमएच १४ टी २७४९) दोन दुचाकींना ठोकरले. दोन्ही दुचाकीवरून जात असलेल्या चौघांपैकी दोघे जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, धडक देणाऱ्या मोटार चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तेथून जात असलेल्या उमेश पटेल यांनी या मोटारचालकाचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने नागरिक व पोलिसांशी अरेरावीही केली.
दुचाकीस्वार ठार
पिंपरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर चिंचवड स्टेशन चौकात झाला. भरधाव वेगातील ट्रकने ठोकरल्याने दुचाकीस्वार गंगाराम यशवंत भोपवे (वय ५६, रा. रुपीनगर) यांचा मृत्यू झाला. राधेशाम धरमसिंह शिरोई (वय ४५, रा. जगदपूर, उत्तरप्रदेश) या चालकाला अटक करण्यात आली आहे.
निगडीवरून पुण्याकडून जाताना दुपारी पावणेएकच्या सुमारास चिंचवड स्टेशन चौकात ट्रकची दुचाकीला समोरून धडक बसली. (प्रतिनिधी)

Web Title: Three killed in four accidents in city; Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.