खुनाच्या तीन घटना

By Admin | Updated: October 17, 2014 23:35 IST2014-10-17T23:35:20+5:302014-10-17T23:35:20+5:30

मेंढय़ा शेतात आल्याच्या कारणावरून कात्रीने वार केल्याने 18 वर्षीय तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना निमगाव सावा येथील गाडगेमळ्यात घडली.

Three incidents of murder | खुनाच्या तीन घटना

खुनाच्या तीन घटना

नारायणगाव : मेंढय़ा शेतात आल्याच्या कारणावरून कात्रीने वार केल्याने 18 वर्षीय तरुण मृत्युमुखी पडल्याची घटना निमगाव सावा येथील गाडगेमळ्यात घडली. ही माहिती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली. धर्मा माधव बलमे (वय 18, रा. मूळ रा वडनेर, ता. राहुरी, सध्या रा. निमगाव सावा) हा या घटनेत मृत्युमुखी पडला. सोपान शिवराम गाडगे (वय 38, रा. निमगाव सावा) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पूर्ववैमनस्यातून खून 
रिहे-खांबोली रस्त्यावर रिहे येथे संदीप ज्ञानेश्वर खानेकर (वय 31, रा. ताथवडे, डांगे चौक) याचा पूर्ववैमनस्यातून आरोपी शरद मारुती सातव, शिवाजी खेंगरे व त्यांच्या अन्य चार साथीदारांनी धारदार शस्त्रने वार करून खून केला. मृत संदीप खानेकर याचे आरोपीबरोबर 2क्12 मध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी काल संदीप रिहे खांबोली रस्त्यावरून जात असताना खून केला. 
ढाब्यावरील वेटरचा खून
मांडवगण फराटा येथील  ढाब्यावर काम करणा:या  गणोश गोसावी (रा. मुंबई) या वेटरचा दोन सहका:यांनी खून केल्याची घटना समोर आली. ढाब्याचे मालक सुरेंद्र आनंदराव जगताप यांनी शिरूर पोलिसांकडे फिर्याद दिली. (वार्ताहर)

 

Web Title: Three incidents of murder