मावळातील तीन ग्रामपंचायत बिनविरोध
By Admin | Updated: July 24, 2015 04:26 IST2015-07-24T04:26:33+5:302015-07-24T04:26:33+5:30
मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ४६५ जागापैकी १३३ जागा बिनविरोध झाल्या. तर पाचाणे, खांड व आढले खुर्द ग्रामपंचायती

मावळातील तीन ग्रामपंचायत बिनविरोध
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ४६५ जागापैकी १३३ जागा बिनविरोध झाल्या. तर पाचाणे, खांड व आढले खुर्द ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३३२ जागांसाठी ७६३ उमेदवार रिंगणात उतरले आहे.
५३२ उमेदवारांनी अर्ज घेतले मागे घेतले. पोटनिवडणुकीत सावळा २, भोयरे २, उधेवाडी २ बेबेडओहोळ १, लोहगड १, भाजे १ व पुसाणे २ या सात ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहणार आहेत. सावळा १, गोडुंब्रे १, इंदोरी १, दिवड १, नाणोली तर्फे चाकण १, टाकवे खुर्द १, कुणेनामा १, औंढे खुर्द १ येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.
गुरुवारी आठवडे बाजार व ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र माघार व चिन्हवाटप असल्याने मोठ्या प्रमाणात सदस्य व समर्थकांनी गर्दी केली होती. शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनाच्या दुतर्फा दोन दोन किलोमीटर रांगा लागल्याने वडगावातील चौकात अनेक वेळा वाहतूककोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त होते. ग्रामपंचायतीचे आजी व माजी सदस्य, पक्षाचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करुन अनेक ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध करण्यासाठी मनधरणी करताना विविध ठिकाणी गटागटाने चर्चा करताना दिसत होते.
(वार्ताहर)