एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: July 24, 2016 05:26 IST2016-07-24T05:26:09+5:302016-07-24T05:26:09+5:30
विजेचा धक्का लागून पती, पत्नीसह दहा महिन्यांचे बालक असे एकाच कुटुंबातील तीन जण मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना देहूरोड येथे सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
देहूरोड : विजेचा धक्का लागून पती, पत्नीसह दहा महिन्यांचे बालक असे एकाच कुटुंबातील तीन जण मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना देहूरोड येथे सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसुार, विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वेलपांडी सेल्वन (वय ३५), मनीपारदी सेल्वन (वय २५) या दाम्पत्याचे दहा महिन्यांचे बालक सस्वीन सेल्वन या तिघांचा समावेश आहे. देहूरोड येथील लक्ष्मीपुरम या सोसायटीत सेल्वन कुटुंबीय राहतात.
त्यांचा इडलीचे पीठ तयार करण्याचा व्यवसाय आहे. इडलीचे पीठ तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या भांड्यात गरम पाणी टाकावे लागते. पाणी गरम करण्यासाठी हिटर लावले आहे. हिटर लावत असताना मनीपारदी सेल्वन यांना विजेचा धक्का लागला. बाजूलाच दहा महिन्यांचे बालक होते. पत्नीला वाचविण्यासाठी वेलपांडी सेल्वन धावून गेले.
हात लावून पत्नीला बाजूला ढकलत असताना त्यांना आणि
त्यांच्या पायाजवळ असलेल्या बालकाला विजेचा धक्का लागला. या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी अंत झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने देहूरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात
येत आहे. (वार्ताहर)