शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक; वाकड पोलिसांची कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 20:30 IST

सहा लाख ८७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत 

ठळक मुद्देघरफोडी करून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी केली दुचाकी खरेदी

पिंपरी : तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून सहा लाख ८७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. 

प्रकाश ऊर्फ नानाभाऊ शंकर लंके (वय ४४, रा. विश्रांतवाडी, पुणे), समीर ऊर्फ सलीम महेबूब पैलवान शेख (वय ३९, रा. हिंजवडी) आणि ओंकार बिभिषण काळे (वय १८, रा. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील पंकज पाटील (रा. वाकड) यांच्या घरी १४ जानेवारी २०२१ रोजी घरफोडी झाली. तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच आणखी सहा गुन्हे केल्याचे कबूल केले. 

आरोपी प्रकाश लंके हा भारतीय माईनॉरिटीज सुरक्षा महासंघ-नॅशनल पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असल्याचे सांगत आहे. आरोपी लंके याच्यावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात १६, खडकीत चार, लोणीकंद आणि विमानतळ ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक असे २२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी समीर शेख याच्यावर लोणावळ्यात दोन तर लोहमार्ग पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे दाखल आहेत.

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, तपास पथकाचे सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, दीपक कादबाने, कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र मारणे, दीपक भोसले, बापूसाहेब धुमाळ, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, नितीन ढोरजे, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, प्रमोद कदम, नितीन गेंगजे, सुरज सुतार, शाम बाबा, सचिन नरूटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, कौंतेय खराडे आणि नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

घरफोडीच्या पैशांतून घेतली दुचाकीघरफोडी करून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी दुचाकी खरेदी केली. त्या दुचाकीसह इतर दोन गाड्या अशा तीन दुचाकी, घरफोडीच्या गुन्ह्यातील ११८ ग्रॅम सोन्याचे दागिने, २० हजारांची रोकड, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, घरगुती साहित्य तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सहा लाख ८७ हजार ६५० रुपयांचा ऐवज आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला. वाकड पोलीस ठाण्यातील पाच, हिंजवडी आणि वडगाव मावळमधील प्रत्येकी एक गुन्हा या कारवाईतून उघडकीस आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकtwo wheelerटू व्हीलर