शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक :दोन पिस्तुल, काडतुसे हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 16:26 IST

गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सहयोगनगर, तळवडे येथे तीन आरोपींविरोधात कारवाई केली

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक :दोन पिस्तुल, काडतुसे हस्तगत पिंपरी : गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सहयोगनगर, तळवडे येथे तीन आरोपींविरोधात कारवाई केली असून त्यांच्याकडून ६० हजार ४०० रुपये किंमतीचे दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे.                       पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ओंकार रमेश हिंगे  (वय १९,रा.बिबवेवाडी),मंगेश दामू मांजरे (वय २०) आणि त्यांचा मित्र मनिष माधव निनादिया अशा तीन आरोपींविरोधात खंडणी, दरोडाविरोधी पथकाने कारवाई केली. खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सापळा रचून सहयोगनरग, ओटास्किमजवळ  ओंकार आणि मंगेश या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी  केली असता, मनिष माधव निनादिया या टिंगरेनगरमधील श्रमिकनगरमध्ये राहणाऱ्या आरोपीकडून पिस्तुल खरेदी केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी टिंगरेनगर येथून मनिष या आरोपीकडे चौकशी केली असता, दोघांना पिस्तुल विक्री केल्याचे त्याने सांगितले.                       पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी, दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, अजय भोसले, विक्रांत गायकवाड, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक