माथाडी असल्याचे सांगून धमकी
By Admin | Updated: June 4, 2017 05:23 IST2017-06-04T05:23:38+5:302017-06-04T05:23:38+5:30
टेम्पोमध्ये घरगुती साहित्य भरत असताना चारचाकीमधून आलेल्या एका सराईत गुन्हेगारासह दोघांनी माथाडी नेता असल्याचे सांगत एका तरुणाला पैशांची मागणी केली

माथाडी असल्याचे सांगून धमकी
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : टेम्पोमध्ये घरगुती साहित्य भरत असताना चारचाकीमधून आलेल्या एका सराईत गुन्हेगारासह दोघांनी माथाडी नेता असल्याचे सांगत एका तरुणाला पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास टेम्पो जाळून टाकण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे घडली.
याप्रकरणी सतीश कालिदास दुधवडे (वय २१, निगडी) या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. तर, त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. वाकड) हा पसार झाला आहे. याबाबत प्रवीण खोत (वय २४, रा. वाकड) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
प्रवीण शुक्रवारी काळेवाडी फाटा येथे त्याचे मामा बालाजी पांढरे यांचे घरगुती साहित्य शिफ्ट करत होता. त्या वेळी आरोपी सतीश आणि विशाल एका कारमधून तिथे आले. विशाल याने आम्ही माथाडी कामगारांचे नेते आहोत असे सांगून धमकावले.