लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या समृद्ध जीवन या कंपनीचा संचालक संदीप निमसे यांनी पुण्यातील कोंढवा येथे घरात घुसून एका महिलेस शिवीगाळ केली. तसेच तुझ्या मुलांना मारण्याची धमकी दिली असून, याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत संबंधित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, संदीप रामचंद्र निमसे हा कोंढवा खुर्द येथील घरात जबरदस्तीने घुसला. त्यानंतर फिर्यादी महिलेस दमदाटी व शिवीगाळ करून त्यांच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारामुळे आमच्या कुटुंबाला धोका असल्याने कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार के. के. कांबळे अधिक तपास करत आहे.
समृद्ध जीवनच्या संचालकाकडून धमकी
By admin | Updated: June 28, 2017 04:06 IST