शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मर्डरची धमकी देत डॉक्टर पतीकडून पत्नीला मारहाण; मुळशी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 15:58 IST

सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : दगडाने चारचाकी वाहनाची काच फोडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या बहिणीला मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळशी तालुक्यातील सूस येथे गुरुवारी (दि. ४) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

दिनकर शेशेराव मस्के (वय ३५, रा. नवी मुंबई), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. ८) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी हे पती-पत्नी असून दोघेही डॉक्टर आहेत. दुसरे लग्न करायचे आहे, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत विचारणा केली. मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही, असे लिहून दे, नाहीतर संध्याकाळी मी कामावरून घरी आल्यानंतर बघ काय करतो, अशी धमकी दिली. तसे लिहून न देता फिर्यादी त्यांच्या बहिणीसोबत चारचाकी वाहनातून पुणे येथे माहेरी येत होत्या. त्यामुळे आरोपी पतीला क्रोध अनावर झाला. थांब तू, मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे. मी जेलमध्ये जायला तयार आहे, अशी धमकी आरोपीने फोनवरून दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीच्या माहेरी येऊन रस्त्यावर थांबला होता. फिर्यादी या चारचाकी वाहनाने तेथे आल्या असता आरोपीने दगड मारला. त्यामुळे वाहनाची काच फुटली. फिर्यादी यांनी त्यावेळी त्यांच्या मुलीचा जीव वाचवला. मात्र त्यांना मार लागला तसेच वाहन चालवत असलेली त्यांची बहीण जखमी झाली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादी यांचे डोके वाहनाच्या दरवाजावर आपटू लागला. फिर्यादीच्या बहिणीने प्रतिकार केला. त्यावेळी आरोपीने त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. मी आता सगळ्यांचा मर्डर करून टाकणार आहे, अशी धमकी दिली. त्यावेळी जास्त गर्दी जमत असल्याचे पाहून आरोपी तेथून पळून गेला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टर