शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लूटमार करणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 19:03 IST

आरोपीवर व मारामारीचे पाच गुन्हे दाखल

ठळक मुद्देदेहूरोड पोलिसांची कारवाई पोलीस कर्मचारी दीपक शिरसाठ यांना पाच हजारांचे बक्षीस   

देहूरोड : दारूच्या दुकानाच्या व्यवस्थापकास गावठी कट्टयाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या गुन्हेगारास देहूरोड येथे रविवारी (दि. २४) रात्री दहाच्या सुमारास गस्तीवर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने पकडले. संबंधित गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याच्यावर लूटमार व मारामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तो लूटमार करीत होता, असे देहूरोड पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्तांकडून पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  दीपक पप्पू पांडे (वय १८, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी कट्टाही जप्त केला आहे. तर दीपक अशोक शिरसाठ (वय २८) असे पाच हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी फोर्स वनचे प्रशिक्षण घेतलेले आहे.देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड बाजारपेठ येथील राजू देवमणी यांना त्यांचे दुकानातच गावठी कट्टा दाखवून लुटण्याचा प्रयत्न करत असताना बाजारात गस्त करणारे देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शिरसाठ यांनी दुकानाजवळ जाऊन पांडे याच्याशी झटापट करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील गावठी कट्टा जप्त केला. त्याच्यावर लूटमार व मारामारीचे पाच गुन्हे दाखल असून यापूर्वी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तो लूटमार करीत होता. पांडे यास गावठी कट्ट्यासह पकडण्याची धाडसी कार्यवाही करणारे पोलीस कर्मचारी दीपक शिरसाठ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त  संदीप बिष्णोई यांनी माहिती मिळताच पाच हजार रोख व प्रशंसापत्र तात्काळ जाहीर केले आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनचे उपायुक्त विनायक ढाकणे, देहूरोड  विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक